अपघाताचा बनाव करून पत्नीकडून पतीचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नाशिक - अपघाताचा बनाव करून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी महिनाभरानंतर या प्रकरणाचा तपास केला आणि दोघांच्या मुसक्‍या आवळल्या. 

नाशिक - अपघाताचा बनाव करून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी महिनाभरानंतर या प्रकरणाचा तपास केला आणि दोघांच्या मुसक्‍या आवळल्या. 

राणी साळवे, अनिल ताठे अशी संशयितांची नावे आहेत. मुंबई- आग्रा महामार्गावरील गुरू नानक पेट्रोलपंपासमोर ३ ऑगस्टला शरद संपत साळवे (वय ३७, रा. श्रीपाद अपार्टमेंट, रामनाथनगर, आडगाव शिवार) याचा मृतदेह आढळला होता. महामार्ग ओलांडताना भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याप्रकरणी आडगाव पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरुद्ध नोंद झाली होती. पण शवविच्छेदनात मृत शरद साळवे याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे आढळल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांचा तपास सुरू होता. मृत शरदच्या आई, वडील आणि भावाने पोलिसांना भेटून त्याच्या मृत्यूला पत्नी व तिचा प्रियकर ताठे कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांना पत्नी राणीच्या जबाबात विसंगती आढळली, तर संशयित ताठे पसार झाल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी होत्या. शुक्रवारी ताठे शहरात आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केला आणि प्रकरणाचा उलगडा झाला. केबल व्यावसायिक ताठे याचे राणीशी प्रेमसंबंध होते. शरद घराबाहेर पडताच ताठे राजरोस राणीला भेटायला येत असल्याने त्याची वाच्यता होत होती. ही बाब शरदच्या कानी पडल्याने तो राणीवर लक्ष ठेवून होता. 

याच वादातून ३ ऑगस्टला शरद झोपला असताना, अनिल ताठे राणीच्या घरी आला. त्या दोघांनी रात्री दीडच्या सुमारास झोपेतील शरदच्या डोक्‍यात हत्याराने वार करून त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून अपघाताचा बनाव केला. दोन्ही संशयितांना न्यायालयाने सोमवार(ता. २५)पर्यंत पोलिस कोठडी दिली.

Web Title: nashik news murder