तरुणीचा धारदार शस्त्राने खून; मृतदेह पेटविला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नाशिक रोड - एकलहरे रोडवरील कर्षण मशिन कारखान्याच्या भिंतीलगत शरीरावर धारदार शस्त्राने वार केलेला व अर्धवट जळालेला युवतीचा मृतदेह काल सकाळी आढळला. हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी सातपूर भागातील एका युवकाला अटक केल्याचे समजते.

नाशिक रोड - एकलहरे रोडवरील कर्षण मशिन कारखान्याच्या भिंतीलगत शरीरावर धारदार शस्त्राने वार केलेला व अर्धवट जळालेला युवतीचा मृतदेह काल सकाळी आढळला. हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी सातपूर भागातील एका युवकाला अटक केल्याचे समजते.

दरम्यान, आठ दिवसांत नाशिक रोड परिसरात ही तिसरी खुनाची घटना आहे. धारदार शस्त्राने तिचा गळा, मान व छातीवर वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वालाग्राही पदार्थ टाकून मृतदेह पेटवून दिला होता. त्यामुळे तिची ओळख पटविणे पोलिसांना सुरवातीला अवघड झाले. त्यामुळे ती युवती कोण आहे?, तिला का मारले? याबाबत पोलिसांना तपास करणे अवघड झाले. मात्र, तपासानंतर ती युवती दिंडोरी रोडवर राहणारी असल्याचे समजते. युवतीचे नाव हर्षदा अहिरे (वय २१) असून, ती घरी न परतल्याने तिच्या नातेवाइकांनी गंगापूर रोड पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरून जळालेल्या युवतीचे नाव हर्षदा अहिरे असल्याचे समजले. मध्यरात्री तिला कोणीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकले व तिचा मृतदेह एकलहरे रोडवर आणून टाकला. ही घटना परिसरात समजताच नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. नंतर घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब व श्‍वानपथकानेही तपासणी करून काही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. मृत युवतीला कोणीतरी फूस लावून आणले. तिच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून तिला जाळून टाकल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे हल्लेखोर आणि मृत युवतीचे जुने भांडण असावे, असाही संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, विजय मगर, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, बाजीराव महाजन, मधुकर कड, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, राकेश शेवाळे आदींनी भेट देऊन पाहणी केली.

हर्षदा शिक्षणासह करीत होती पार्टटाइम काम
दिंडोरी रोडवरील कलानगर परिसरात राहणारी हर्षदा के. के. वाघ महाविद्यालयात टी.वाय.बी.एस्सी.च्या वर्गात शिकत होती आणि कॉलेज रोडवरील खासगी क्‍लासमध्ये पार्टटाइम काम करीत होती. सायंकाळी साडेसातला ती क्‍लासमधून निघून दुचाकीवरून रात्री आठ ते साडेआठपर्यंत घरी पोचायची. सोमवारी (ता. २९) ती घरी न आल्याने तिच्या मामाने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. मात्र, तेथेही तिच्याबाबत माहिती मिळाली नाही. अखेर रात्री एक-दीडच्या सुमारास मामाने गंगापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. सकाळी पोलिसांना नाशिक रोड परिसरात युवतीचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी शहानिशा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पालकांना बोलाविले. तेव्हा तिची ओळख पटली. तिची दुचाकी कॉलेज रोडवरील क्‍लासमध्ये आढळून आली. 

Web Title: nashik news murder crime