अवघ्या १४ दिवसांत पाच खून;वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नाशिक - शहराच्या गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा करणाऱ्या पोलिस प्रशासनासमोर गुन्हेगारांनी मोठे आव्हान उभे केले असून, १४ दिवसांत खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत. गॅंगवारमधून दोघांची भरवस्तीत हत्या झाली. 

नाशिक - शहराच्या गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा करणाऱ्या पोलिस प्रशासनासमोर गुन्हेगारांनी मोठे आव्हान उभे केले असून, १४ दिवसांत खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत. गॅंगवारमधून दोघांची भरवस्तीत हत्या झाली. 

एप्रिल २०१७ अखेरपर्यंत नाशिक शहर परिसरात ११ खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मेमध्ये खून, हत्यांचे प्रकार सुरूच राहिले. १८ मेस रात्री पंचवटीतील नवनाथनगरमध्ये सराईत गुन्हेगार किरण निकम याचा गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. २२ मेस जेल रोडला अपार्टमेंटमध्ये शीतल जगताप या महिलेचा अनैतिक संबंधातून दोघांनी खून केला; तर २५ मेस किरण निकम खून प्रकरणातूनच निकम टोळीने भरदिवसा उपनगरच्या मंगलमूर्तीनगरमध्ये १५ वर्षीय तुषार साबळे याची निर्घृण हत्या संशयित बंड्या मुर्तडक समजून केली. 

काल म्हसरूळ परिसरातील हर्षदा अहिरे हिचा लग्नाच्या तगाद्यातून तिचा प्रियकर रोहित पाटील यानेच खून करून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज पंचवटीतील महापालिकेचा सफाई कामगार अरुण बर्वे यांचा खून करून मृतदेह गोदापात्रात फेकून देण्यात आला.

प्रेमसंबंध वा अनैतिक संबंधातूनच घटना घडल्या आहेत.गॅंगवारमधून खुनाचे प्रमाण अल्प आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी आणि गुन्हेगारांची शोधमोहीम सुरू आहे.  
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

Web Title: nashik news murder crime