नाशिक: जावयाकडून सासू व मेव्हणीच्या मुलाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

दशरथ सोनू खराटे यांचा जावई संशयित मोतीराम बदादे याने राहत्या घरून सासू आणि मेव्हणीच्या आठ वर्षीय मुलाला दुचाकीवर घेऊन आला. रामवाडीच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या जंगलात दोघांना आमिष दाखवून नेले आणि त्यांचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केला.

नाशिक : पंचवटीतील मखमलाबाद शिवारातील गंधारवाडी वस्तीमध्ये जावयाने सासूसह मेव्हणीच्या आठ वर्षीय मुलाची कोयत्याने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली.

दशरथ सोनू खराटे यांचा जावई संशयित मोतीराम बदादे याने राहत्या घरून सासू आणि मेव्हणीच्या आठ वर्षीय मुलाला दुचाकीवर घेऊन आला. रामवाडीच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या जंगलात दोघांना आमिष दाखवून नेले आणि त्यांचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केला.

यात मंदाबाई दशरथ खराटे (वय 55), नैतिक विशाल लिलके (वय 8) यांचा समावेश आहे. त्यानंर मोतीराम याने दुचाकीवरून पुन्हा सासूचे घर गाठले आणि सासरे दशरथ सोनू खराटे यांना सासूची लूटमार होत असल्याचे खोटे सांगून दुचाकीवर बसवून घटनास्थळावर आणले. त्यांना आणि त्यांच्यावरही धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. त्यांनी काही वार चुकविले; मात्र यात गंभीर मार लागल्याने ते सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या दिशेने पळाले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तसेच पंचवटी पोलिसांनाही खबर दिली. जावई बदादे घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पंचवटी पोलिस त्याच्या मागावर आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Nashik news murder in nashik