'नॅब'च्या राज्य पुरस्कारांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

नाशिक - नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) या संस्थेतर्फे 2017 च्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारासाठी गोंदियाचे प्रा. शशिकांत चवरे, आदर्श प्राध्यापक पुरस्कार (अंध), बदलापूरचे गणेश तायडे (डोळस शिक्षक), खानापूरचे (जि.अमरावती) विनायक खाडे (अंध शिक्षक), सोलापूरच्या कमल पावटे (डोळस शिक्षिका) व अहमदनगरच्या सविता कांबळे (डोळस शिक्षिका) यांना गौरविण्यात येणार आहे. याशिवाय विशेष नैपुण्य क्रीडा पुरस्कारासाठी नागपूरच्या आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे (दृष्टीबाधित) यांची निवड झाली. यंदाच्या आदर्श संस्था पुरस्कारासाठी पुण्याच्या निवांत अंध मुक्त विकासालय या संस्थेची निवड झाली आहे. चार जानेवारीला पुरस्कार वितरण होणार आहे.
Web Title: nashik news nab state award announcing