नाशिककर नमिता कोहोक ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नाशिक - येथील नमिता कोहोक यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळविले. समाजसेवेला वाहिलेल्या आणि जगभरात विस्तार असलेल्या ग्लोबल युनायटेड या संस्थेतर्फे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आपली छाप सोडत त्यांनी ‘मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.

अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत त्यांना गौरविण्यात आले. त्यामुळे नाशिकचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचले आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर नमिता कोहोक यांना मुकुट देऊन गौरविले. नाशिककरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. पुरस्कारासंदर्भात कोहोक म्हणाल्या, की स्वप्नपूर्तीच्या प्रवासात मी ‘मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७’ हा किताब जिंकला आहे. मला नेहमीच विश्‍वास होता, की स्वप्ने सत्यात उतरतात. फक्त स्वतःवर विश्‍वास ठेवायला हवा. प्रामाणिकपणे व समर्पण भावाने प्रयत्न करायला हवे. अमेरिकेतील मिनियापोलिस येथील मिनेसोटा येथे एमआरएस.एमआरएस.जीब्लॉटल संयुक्त २०१७ मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

Web Title: nashik news namita kohok misses global united