नांदूर मध्यमेश्‍वरला 19 पासून पक्षिसंमेलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

नाशिक - वन्यजीव विभागातर्फे प्रथमच नांदूर मध्यमेश्‍वर अभयारण्यात 19 जानेवारीपासून तीनदिवसीय पहिले पक्षी संमेलन होणार आहे. स्थानिक पक्ष्यांचे वास्तव्य, परदेशी पाहुण्यांचे आगमन याबाबतची माहिती शालेय विद्यार्थी, पक्षिप्रेमी, पर्यटक, वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना व्हावी, यासाठी हे संमेलन होत आहे. या निमित्ताने विविध स्पर्धा, चर्चासत्राबरोबरच पक्षिनिरीक्षणाची संधी मिळणार आहे. याबाबत वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, 

दरवर्षी हिवाळ्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्‍यात नांदूर मध्यमेश्‍वर धरण परिसरात तयार झालेल्या जैवविविधतेमुळे अनेक परदेशी पक्ष्यांचे येथे आगमन होते. हेच औचित्य साधून वन्यजीव विभागातर्फे यंदा प्रथमच पक्षी संमेलन होत आहे. पक्षी संमेलनात सहभागी होण्यासाठी, नोंदणी, कार्यक्रमाची रूपरेषा, स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी या www.birdfestival.nashikwildlife.com संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे 

Web Title: nashik news Nandur Madhyeshwara wildlife bird festival