नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्यात १९५२६ पक्षी दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

निफाड, नांदूरमध्यमेश्‍वर - नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्यात देश- विदेशातील पक्षी दाखल झाले आहेत. आज वन्यजीव विभागाने घेतलेल्या पक्षी गणनेत देश-विदेशातील १९ हजार ५२६ विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले.

निफाड, नांदूरमध्यमेश्‍वर - नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्यात देश- विदेशातील पक्षी दाखल झाले आहेत. आज वन्यजीव विभागाने घेतलेल्या पक्षी गणनेत देश-विदेशातील १९ हजार ५२६ विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले.

ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्यात हजारो मैलांचा प्रवास करीत पक्षी दाखल होण्यास सुरवात झाली आहे. या धरण क्षेत्रात २४ प्रकारचे मासे, ४०० पेक्षा अधिक पानवनस्पती, २५० हून अधिक प्रजातीचे पक्षी आहेत. दर वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या हंगामात येथील तापमान ० ते १२ अंश सेल्सिअस असते. याच कालावधीत सैबेरिया, मंगोलिया, हिमालय, अफगाणिस्तान आदी ठिकाणांहून येथे पक्षी येतात. यातील काही पक्षी, तर येथेच स्थायिक झाले आहेत. 

अभयारण्यात आगमन झालेल्या पक्ष्यांची दर महिन्याला गणना करण्यात येते. आज झालेल्या गणनेत सहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे, (नाशिक), वनपरिमंडळ अधिकारी पी. के. आगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. ढाकरे, पक्षीमित्र गंगाधर आघाव, दत्ता उगावकर, डॉ. उत्तम डेर्ले, प्रा. आर. बी. पाटील, किरण बेलेकर, राहुल वडघुले, तसेच वनविभाग गाइड अमोल दराडे, प्रमोद दराडे, वनसमिती सदस्य शंकर लोखंडे, अमोल डोंगरे, रोशन पोटे, पंकज चव्हाण, शंतनू चव्हाण, ओमकार चव्हाण आदींनी  गणना केली.

Web Title: nashik news Nanduramadhyameshwar sanctuary birds