राणे मंत्रिमंडळात येणारच; युतीही अभेद्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

नाशिक - स्वतंत्र पक्षाची स्थापना केलेले नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावर आज राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी शिक्कामोर्तब केले. राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशामुळे युतीमध्ये काहीही बिघाड होणार नसून, ती अभेद्यच असल्याचे सांगत, सरकार आपला कार्यकाळही पूर्ण करेल. त्यामुळे मध्यावधी वा सरकार अस्थिर असल्याचा वावड्या खोट्या असल्याचा दावाही बापट यांनी केला. 

पत्रकार परिषदेमध्ये बापट बोलत होते. ते म्हणाले, की नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे सरकार अस्थिर होणार असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात तसे काहीही होणार नाही. त्यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्‍चित आहे. त्यामुळे कोणालाही आपल्या खिशातील राजीनामेही काढण्याची गरज नाही. कारण, उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट संवाद आहे. 

युतीमध्ये मोकळेपणाचे वातावरण आहे, युती अभेद्य आहे. त्यामुळे युतीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री हे सक्षम आहेत, असेही बापट यांनी स्पष्ट केले. 

पेट्रोल पंपांचेही ऑडिट 
वजन-मापांमध्ये ग्राहकांची लूट करणाऱ्या पेट्रोल पंपांचेही ऑडिट होणार. अत्याधुनिक यांत्रिक सुविधांचा वापर करून ते पंपांना लावले जाणार. पंपचालकाने जर ते सील तोडून फेरफार करण्याचा प्रयत्न केला तर पंपावरील ते मशिन आपोआप बंद होणार आणि त्याची थेट सूचना पेट्रोल कंपनी- पुरवठा विभागाला जाणार. कंपनी व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीशिवाय तो पंप सुरू होणार नाही. वेळप्रसंगी चौकशी करून पंपाची मान्यताही रद्द होऊ शकेल.

Web Title: nashik news narayan rane bjp girish bapat