नाशिकमधील गडकरी चौकात अपघात; तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नाशिक : नाशिकमधील गडकरी चौकात आज पहाटे झालेल्या दोन मोटारींच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य काही जण जखमी झाले आहे.

नाशिक : नाशिकमधील गडकरी चौकात आज पहाटे झालेल्या दोन मोटारींच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य काही जण जखमी झाले आहे.

आज पहाटे गडकरी चौकात बीएमडब्ल्यू मोटार (एमएच 01 एएल 7931) आणि स्विफ्ट मोटारीचा (एमएच 15 डीसी 0527) समोरासमोर धडक झाली. स्विफ्ट मोटारीत मूळ जळगावचे असलेले भामरे कुटुंबिय योगिनीला लग्नाचे स्थळ दाखविण्यासाठी ब्राह्मणगावच्या दिशेने जात होते. या अपघातात योगिनी भामरे (वय 19), योगिनीची आई सरिता भामरे (वय 35) आणि योगिनीची मावशी रेखा प्रकाश पाटील (वय 33, रा. मुंबई) मृत्युमुखी पडल्या आहेत. तर लिलाधर भामरे आणि चालक शामकुमार पाटील किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: nashik news nashik accident gadkari chowk bmw accident