नागरी समस्यांवरून तू तू-मैं मैं 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नाशिक रोड - नाशिक रोड प्रभाग सभेत गुरुवारी (ता. 18) प्रभागांतील बंद पथदीप, कमी दाबाने पाणी येणे, अस्वच्छता, अतिक्रमण, आरोग्य आदी विषयांवर सर्वच नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी नगरसेवक व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कार्यक्षम अधिकारी मिळावे, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. 

नाशिक रोड - नाशिक रोड प्रभाग सभेत गुरुवारी (ता. 18) प्रभागांतील बंद पथदीप, कमी दाबाने पाणी येणे, अस्वच्छता, अतिक्रमण, आरोग्य आदी विषयांवर सर्वच नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी नगरसेवक व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कार्यक्षम अधिकारी मिळावे, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. 

नाशिक रोड प्रभाग समितीची बैठक महापालिका विभागीय कार्यालयात सभापती अनिता सातभाई यांच्या अध्यक्षेखाली झाली. त्यात विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. प्रशांत दिवे यांनी नाशिक रोड विभागाला पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी सर्वच विभागाने प्रयत्न करावे, असे सांगितले. स्मशानभूमीत पथदीप बंद असल्याने रात्री नागरिकांना मोबाइलच्या प्रकाशात मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. याबाबात विद्युत विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधूनही मोबाइल उचलत नाहीत, असे संतोष साळवे, ज्योती खोले यांनी सांगून नाराजी व्यक्ती केली. नाशिक रोड परिसरात अतिक्रमणे वाढले आहेत. अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमण विभागाचे काही कर्मचारी त्यांच्याकडून हप्ते घेतात, असा आरोप नगरसेवकांनी केला. डॉ. सीमा ताजणे म्हणाल्या, की बिटको रुग्णालयात औषधे देण्यास टाळाटाळ करतात. औषधे बाहेरून आणण्यास सांगितले जाते. कोमल मेहेरोलिया म्हणाल्या, की अनेक बांधकाम व्यावसायिक व नागरिक घराच्या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे. संबंधितांवर कारवाई करावी. विद्युत विभाग काही काम करीत नसल्याचा आरोप सर्व नगरसेवकांनी केला. या विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या वादामुळे विभागातील काम होत नसल्याचे आरोप नगरसेवकांनी केला. संगीता गायकवाड, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, सुनीता कोठुळे, मीरा हांडगे, मंगला आढाव, कोमल मेहेरोलिया, दिनकर आढाव, अंबादास पगारे, विशाल संगमनेरे, केशव पोरजे, रमेश धोंगडे, स्वीकृत सुनील गोडसे, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर आदी उपस्थित होते. 

Web Title: nashik news nashik municipal