मनपात हजेरीनुसार वेतन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नाशिक - महापालिकेचे कामकाज न करता इतर कामांमध्ये अधिक रस घेऊन कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आयुक्तांनी कंबर कसली आहे. दोन दिवसांमध्ये थेट कार्यालयांमध्ये अचानक भेट देऊन हजेरीचा आढावा घेतला जात आहे. हजेरीबाबत अनियमितता आढळल्याने आता बायोमेट्रिक यंत्रात झालेल्या हजेरीच्या नोंदणीप्रमाणेच वेतन काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये प्रशासनातर्फे बायोमेट्रिक हजेरी यंत्रे लावली आहेत. एकदा यंत्रांवर नोंदणी झाल्यानंतर कर्मचारी दांडी मारत असल्याचे प्रकार लक्षात आल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. शुक्रवारी आयुक्तांनी आरोग्य व झोपडपट्टी विभागात हजेरी लावली. तेथे तीन लोक गैरहजर आढळले. तर आज नगररचना विभाग, भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा विभाग, वैद्यकीय विभागात कर्मचाऱ्यांची उपस्थिती व हजेरी तपासली. आजच्या भेटीत आरोग्य विभागात चार, सुरक्षा विभागात दोन, यांत्रिकी विभागात दोन कर्मचारी गैरहजर आढळले. काही दिवसांमध्ये सातत्याने गैरहजेरीचे प्रमाण आढळत असल्याने त्यावर उपाय म्हणून बायोमेट्रिक यंत्रावरील हजेरीच्या नोंदीनुसारच वेतन करण्याचा निर्णय घेतल्याचे आयुक्त कृष्णा यांनी सांगितले.

श्रावणी सोमवारची सुटी रद्द
श्रावणानिमित्त दर सोमवारी दोन तास अगोदर कर्मचाऱ्यांना सुटी देण्याची परंपरा आहे. त्यानुसार आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी चार सोमवारसाठी तशी सवलत दिली होती. आता हा निर्णय मागे घेतला आहे. श्रावणी सोमवारी कर्मचारी जेवणाच्या सुटीतच गायब होत गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना तातडीने पत्र पाठवून सुटी रद्द केल्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: nashik news nashik municipal corporation