महापालिकेत पुन्हा पदोन्नतीचा उडणार बार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नाशिक - पाच वर्षांपूर्वी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पदोन्नती देण्याचे धोरण राबविण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा पदोन्नती दिली जाईल. त्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होत आहे. धोरण निश्‍चित केले जाईल. ५० टक्के पदोन्नती देण्याचे धोरण अवलंबिले जाणार आहे.

महापालिकेत सात हजार २०० पदांना मंजुरी आहे. त्यांपैकी सध्या पाच हजार २०० पदे कार्यरत आहेत. दरमहा पंधरा ते वीस कर्मचारी निवृत्त होतात. त्यांच्या रिक्त जागा भरल्या जात नाहीत. महापालिकेचा महसुली खर्च ४० टक्‍क्‍यांवर गेल्याने शासनाने रिक्त पदांच्या भरतीवर बंदी आणली आहे. पण प्रशासनाला पदोन्नती देता येणार आहे. पदोन्नती रखडल्याने कर्मचाऱ्यांत असंतोष आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होत असल्याचे निदर्शनास आल्याने २०१२ मध्ये तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी पदोन्नतीचे धोरण अवलंबिले होते. 

इन कॅमेरा झालेल्या पदोन्नती प्रक्रियेत शंभर टक्के पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे कनिष्ठ लिपिकाचे वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षकांचे अधीक्षक यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर एक हजार १२५ कर्मचाऱ्यांना बढती मिळाली. शंभर टक्के पदोन्नतीमुळे पदोन्नतीचा कोटा पूर्ण झाला होता. त्यानंतर पाच वर्षांत पदोन्नतीची प्रक्रिया थांबल्याने पुन्हा पदोन्नतीचे घोडे अडले आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वरच्या पदावर काम करण्याची आस निर्माण झाल्याने प्रशासनावर दबाव वाढत आहे. विद्यमान आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीही प्रशासनाला पदोन्नतीची खंडित झालेली प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: nashik news nashik municipal corporation