मनपाच्या खतनिर्मितीमध्ये दहा टक्‍क्‍यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नाशिक - महापालिकेचा खतनिर्मिती प्रकल्प खासगी तत्त्वावर चालविण्यास दिल्यानंतर महापालिकेच्या खतनिर्मितीमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. यात शहरातून कचरा संकलनदेखील पाचशे टनाच्या पुढे गेले आहे. 

नाशिक - महापालिकेचा खतनिर्मिती प्रकल्प खासगी तत्त्वावर चालविण्यास दिल्यानंतर महापालिकेच्या खतनिर्मितीमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. यात शहरातून कचरा संकलनदेखील पाचशे टनाच्या पुढे गेले आहे. 

महापालिकेचा पाथर्डी फाटा येथील खत प्रकल्प जुने मशनिरी, अपुऱ्या कार्यक्षमतेमुळे अनेक वेळा बंद राहात होता. त्यामुळे हा नेहमीच महापालिका पदाधिकारी व नाशिककरांसाठी चर्चेचा विषय ठरत होता. हा खत प्रकल्प खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेऊन ॲबकॉस या कंपनीस चालविण्यास दिल्यापासून तो चांगल्या स्थितीत आला आहे. कंपनीने येथील यंत्राची दुरुस्ती करत पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प कार्यान्वित केला. त्यामुळे महापालिकेची खतनिर्मिती दहा टक्के वाढली. 

महापालिकेच्या ताब्यात असताना पूर्वी खत प्रकल्पात दररोज घंटागाड्यांच्या माध्यमातून सुमारे ४२५ ते ४५० टन कचऱ्याचे संकलन केले जात होते. यातून अवघी सहा ते दहा टक्के खतनिर्मिती केली जात होती. परंतु आता कचरा संकलनही वाढले आहे. काही महिन्यांपासून खतनिर्मिती ६० टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे. दैनंदिन कचरा संकलनातही वाढ झाली असून, १ जुलै ते ४ जुलैपर्यंत सुमारे दोन हजार १४९ टन इतका कचरा संकलन करण्यात आला आहे.

Web Title: nashik news nashik municipal corporation fertilizer

टॅग्स