नवरात्रोत्सवासाठी सरसावली सळसळती तरुणाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नाशिक - नवरात्रोत्सवाचे वेध तरुणाईला लागले आहेत. नवरात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या गरबा- दांडियासाठी लागणाऱ्या घागरा, केडिया या कपड्यांच्या बुकिंगसाठी तरुणाईची लगबग सुरू आहे. यंदा गोंडे, चकला-चकली, लटकन यांची सजावट असलेल्या कपड्यांना मोठी मागणी आहे.

नाशिक - नवरात्रोत्सवाचे वेध तरुणाईला लागले आहेत. नवरात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या गरबा- दांडियासाठी लागणाऱ्या घागरा, केडिया या कपड्यांच्या बुकिंगसाठी तरुणाईची लगबग सुरू आहे. यंदा गोंडे, चकला-चकली, लटकन यांची सजावट असलेल्या कपड्यांना मोठी मागणी आहे.

दांडियासाठी लागणाऱ्या कपड्यांची अनेक दुकाने शहरात थाटली आहेत. काही कपडे भाडेतत्त्वावरही मिळतात. तरुणांच्या बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार दर वर्षी काहीतरी हटके लुक देण्यात येतो. तो यंदाही दिसत आहे. राजस्थानी घागरा प्रामुख्याने कॉटनचा असतो. मात्र, गरबा- दांडिया खेळताना घामामुळे अनेकदा त्याचा रंग जातो. हे टाळण्यासाठी या घागऱ्यात वैविध्य येत आहे. यात ज्यूटचा घागरा, ब्रॉकेड घागरा, बोरी घागरा, घागऱ्यांमध्ये फरचाही वापर यंदा करण्यात आला आहे. जास्त घेराच्या घागऱ्यांना मागणी आहे. यात प्रामुख्याने १४ ते १६ मीटरपर्यंतचा घेर असलेल्या घागऱ्यांना मागणी आहे. टिपीकल काठियावाड घागऱ्यांत घंटी, मोतीकाम, आरशांची मीनाकारी करण्यात आली आहे, तर जिन्सवर घालता येतील असे लाँग टॉपही विविध प्रकारात उपलब्ध आहेत. धोती लाँग टॉप असेही प्रकार आहेत. तसेच घागऱ्यांतही लाँग, शॉर्ट असे दोन्हीही प्रकार पाहायला मिळतात.  

टिपिकल राजस्थानी प्रकारातील चकला- चकील अर्थात, बाहुल्या, गोंडे, वेलवेट, चिमण्या अशा लटकनांना आधुनिक साज मिळाल्याने त्याची क्रेझ वाढत आहे. २५० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत, तर भाड्याने बाराशे रुपयांपासून सहा हजारांपर्यंत हे ड्रेस उपलब्ध आहेत.

कोंबडा टोपी, महाराजा टोपी, राजस्थानी साफा, काठियावाड पगडी यांना तरुणांकडून विशेष मागणी आहे, तर मेटल कॅप, मेटल ओढणी ही नृत्यासाठी सोयीची असल्याने तरुणींकडून त्याला पसंती मिळत आहे. आवडत्या रंगाचे, डिझाइनचे ग्रुपने कपडे बुक करण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने येत आहे. 
- वृषाली माहेगावकर, संचालिका, कला डिझाइन 

Web Title: nashik news navratrotsav preparation