...तर एक मार्चपासून असहकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

नाशिक - सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी असून, यासंदर्भात येत्या १६ जानेवारीस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत गांभीर्य दाखविले नाही, तर एक मार्चपासून राज्यात असहकार आंदोलन केले जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर प्रतिभा शिंदे यांनी दिली.

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीमधून काही संघटनांनी बाहेर पडण्याचे जाहीर केल्यानंतर आज नाशिक येथे प्रतिनिधींची बैठक प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला २१ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  त्यामुळे आम्हीच सुकाणू समिती आहोत, असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केले. प्रतिभा शिंदे, रघुनाथदादा पाटील, अजित नवले आदींनी माहिती दिली.

आम्ही एकच; गैरसमज दूर करणार
शिंदे म्हणाल्या की, सुकाणू समितीची एकजूट कायम आहे. काही सदस्यांचे गैरसमज आहेत. त्या सर्वांची दोन दिवसांत भेट घेऊन त्यांना सोबत येण्याचे आवाहन करणार आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, बच्चू कडू यांना कामे असल्यामुळे त्यांना अनुपस्थित राहण्यास परवानगी दिल्याचा खुलासा त्यांनी केला; परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारीही बैठकीला नसल्याबद्दल ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. 

Web Title: nashik news non-cooperation from March one