कांद्याच्या भावामधील घसरण सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

नाशिक - कांद्याचे आगार असलेल्या जिल्ह्यात भावामधील घसरण सुरू राहिली आहे. कालच्या (ता. 7) तुलनेत आज लासलगावमध्ये 25, मनमाडमध्ये 400, पिंपळगावमध्ये 250 रुपयांनी क्विंटलला भाव कमी झाले आहेत. सद्यःस्थितीत पुण्याच्या चाकण भागातील टिकाऊ असलेल्या गरवा कांद्याची निर्यात होणार असून, उन्हाळ कांद्याची आवक वाढून तो निर्यातीला जाण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

चांगला भाव मिळतो म्हटल्यावर शेतकऱ्यांनी रांगडा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आणण्यास सुरवात केली; पण हा कांदा निर्यातीला जाणे शक्‍य नसल्याने भावातील घसरणीला सुरवात झाली. आज लासलगावमध्ये 1 हजार 725 रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला.

देशांतर्गतचे बाजारभाव
(क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजारपेठ काल (ता. 7) आज
आग्रा 2 हजार 400 2 हजार 420
चेन्नई 2 हजार 500 2 हजार 300
जयपूर 2 हजार 100 2 हजार 100
कोलकता 3 हजार 2 हजार 938
लखनौ 2 हजार 2 हजार
मणिपूर 2 हजार 100 2 हजार 180
मथुरा 2 हजार 840 2 हजार 800
पाटणा 2 हजार 600 2 हजार 600

Web Title: nashik news north maharashtra news onion rate decrease