ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

नाशिक - सातपूर "आयटीआय'च्या 285 प्रशिक्षणार्थींनी पहिल्या सत्राची ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी गुरुवारी केली. कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक ऑनलाइन परीक्षा घेण्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती असून, ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी करत आज विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

कौशल्य आणि उद्योजकता विकास विभागाच्या अखत्यारितील सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 5 फेब्रुवारीपासून प्रशिक्षणार्थींच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा पारंपरिक पद्धतीने उत्तरपत्रिकेद्वारे (ओएमआर शीट) घेण्याची तयारी झाली असतानाच ती ऑनलाइन पद्धतीने घेण्याविषयीची माहिती 3 फेब्रुवारीला मिळाली. तालुका स्तरावर ऑफलाइन पद्धतीने व जिल्हा स्तरावर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याच्या या भेदभावाविरोधात विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

Web Title: nashik news north maharashtra news online exam cancel