शहरातील ३८ टेरेस हॉटेलांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नाशिक - मुंबई येथील कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे शहरातील टेरेसवर चालणाऱ्या हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सहा विभागांत ३८ हॉटेल टेरेसवर सुरू असल्याची माहिती समोर आली असून, याबाबत हॉटेलमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. सर्वाधिक हॉटेल पश्‍चिम विभागात असून, पूर्व विभागात फक्त एकच हॉटेल आहे. त्याखालोखाल सिडको विभागात मुंबई महामार्गावर हॉटेलची संख्या अधिक आहे. 

नाशिक - मुंबई येथील कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे शहरातील टेरेसवर चालणाऱ्या हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सहा विभागांत ३८ हॉटेल टेरेसवर सुरू असल्याची माहिती समोर आली असून, याबाबत हॉटेलमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. सर्वाधिक हॉटेल पश्‍चिम विभागात असून, पूर्व विभागात फक्त एकच हॉटेल आहे. त्याखालोखाल सिडको विभागात मुंबई महामार्गावर हॉटेलची संख्या अधिक आहे. 

मुंबईत हॉटेलला लागेलल्या आगीत १४ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तर ५५ लोक जखमी झाले होते. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये टेरेसवर चालणाऱ्या हॉटेलची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी तातडीने मागविली होती. त्यातून ही माहिती समोर आली. नगररचना विभागाकडून अतिक्रमण विभागाकडे अनधिकृतपणे चालणाऱ्या टेरेस हॉटेल्सची माहिती सोपविली असून, तातडीने नोटिसा बजावल्या आहेत.

टेरेसवर थाटलेली हॉटेले
पश्‍चिम विभाग- हॉटेल प्लेअर बार (थत्तेनगर), एम. डी. सफायर (मॉडेल चौक), व्हायटेक्‍स (प्रसाद सर्कल), रूफ टेक (कॉलेज रोड), एन्टर द ड्रॅगन (बिग बझारजवळ), फर्माइश हॉटेल (मॉडेल कॉलनी), हॉटेल पतंग (राका कॉलनी), हॉटेल याहू (शरणपूर लिंग रोड), कोपा कबाना (पंडित कॉलनी), हॉटेल मनोरथ (शरणपूर रोड), हॉटेल २१ सेंच्युरी (कुलकर्णी गार्डनसमोर), बार्बी क्‍यू बिस्ट्रो (मुंबई नाका), हॅपी नाशिक टाइम्स (कालिका मंदिराशेजारी), टॉक ऑफ दी टाउन (जुना त्र्यंबक नाका), डी सेलर टेरेस हॉटेल (कॅनडा कॉर्नर), हॉटेल सम्राट (जुना आग्रा रोड). 

पंचवटी विभाग - हॉटेल न्यू पंजाब (मालेगाव स्टॅंड), हॉटेल प्रेस्टिज पॉइंट (नांदूर नाका), हॉटेल मजा (नांदूर नाका), हॉटेल कारवा (नांदूर नाका), हॉटेल राऊ (मखमलाबाद चौफुली).

सिडको विभाग - शिवसागर (त्रिमूर्ती चौक), सुयोग हॉटेल (त्रिमूर्ती चौक), साईराज दरबार (त्रिमूर्ती चौक), साईविजय (अंबड-पाथर्डी लिंक रोड), न्यू पद्मा (त्रिमूर्ती चौक), हॉटेल पोर्टिको, हॉटेल हेमराज, हॉटेल दी पाल्म, हॉटेल सेलिब्रेशन (वडनेर- पाथर्डी रस्ता), हॉटेल ग्रॅण्ड अश्‍विन (पाथर्डी फाटा).

नाशिक रोड विभाग - हॉटेल श्रद्धा, हॉटेल नालंदा (नाशिक रोड), स्कायबार (सैलानीबाबा बसस्टॉप), गायकवाड क्वॉलिटी फूड्‌स (रेजिमेंटल प्लाझा).
पूर्व विभाग ः हॉटेल कामत (पुणे रोड).

कर्मचाऱ्यांचे लागेबांधे?
शहरात अनधिकृतपणे टेरेसवर हॉटेले चालतात, ही बाब आतापर्यंत नगररचना व अतिक्रमण विभागाकडून दुर्लक्षित करण्यात आली. मुंबईतील घटना घडल्यानंतर अनधिकृत टेरेसचा प्रश्‍न समोर आला आहे. वास्तविक टेरेसचा अनधिकृतपणे वापर करून त्यातून लाखो रुपये कमविले जातात. त्यातून अनधिकृत कामांवर देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याने त्यातून लागेबांधे असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: nashik news notice to 38 terrace hotel