नगररचना विभागाकडून ३२४ आस्थापनांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नाशिक - महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ३२४ इमारतींच्या बेसमेंट व टेरेसचा अनधिकृत व्यावसायिक कारणासाठी वापर सुरू असल्याचे समोर आले. इमारतींच्या बेसमेंटमध्ये ११८ गुदामे, ४६ हॉटेल, १५२ दुकाने व ५३ इतर वाणिज्य आस्थापनांचा वापर सुरू आहे. नगररचना विभागाने अनधिकृतपणे चालणाऱ्या या आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत.

मुंबईतील कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत चौदा जणांचा मृत्यू, तर ५५ लोक जखमी झाले होते. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या हद्दीमधील अशा प्रकारे सुरू असलेल्या अनधिकृत आस्थापनांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नगररचना विभाग, अतिक्रमण व अग्निशमन दलाने हे सर्वेक्षण केले. नगररचना विभागाकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर अनधिकृतपणे वापर सुरू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्याव्यतिरिक्त शहरात १६६ लॉन्स व मंगल कार्यालये अनधिकृतपणे सुरू असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Web Title: nashik news notice by city structure department