चौंडी कुंडात पाय घसरून पडलेल्या वृद्धाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नाशिक - घायटीपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील पासष्टवर्षीय वृद्ध चौंडी कुंडात अंघोळीसाठी गेले असता, पाय घसरून पडले. त्यांना हरसूल रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हरसूल पोलिसांत नोंद करण्यात आली. लक्ष्मण मावजी घुटे (वय 65, रा. मु. घायटीपाडा) रविवारी दुपारी चारच्या सुमारास घायटीपाडा येथील चौंडी कुंडामध्ये अंघोळीसाठी गेले, त्या वेळी त्यांचा पाय घसरून कुंडात पडले. यात ते जखमी झाले होते. त्यांना मुलगा पांडू घुटे याने हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी (ता. 27) दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Web Title: nashik news old man death in chaundi kund