नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू

खंडू मोरे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

खामखेडा (नाशिक): कळवन तालुक्‍यात वीज पडून चाचेर (ता. कळवण) येथील एक तरूण जखमी झाला होता. उपचारा दरम्यान बुधवारी (ता. 11) त्याचा मृत्यू झाला.

चाचेर येथील पांढरीपाडा येथील रवींद्र संतोष पवार याच्या अंगावर वीज कोसळून तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, उपचारासाठी त्याला कळवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, बुधवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शनिवारी (ता. 7) सायंकाळी चाचेर येथील पांढरीपाड्या वरील रवींद्र संतोष पवार (वय ३०) हा आपल्या घरालगत ६ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पावसात सीताफळच्या झाडावरील सीताफळ तोडत असताना रवींद्रच्या अंगावर वीज कोसळली. यात तो गंभीर जखमी झाला होता. पाड्या वरील नागरिकांनी त्याला कळवण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, प्राथमिक उपचार करून त्याला चांदवड व त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. बुधवारी रात्री उपचारा दरम्यान नाशिक येथे रवींद्रचा मृत्यू झाला.

शेतमजुरी करत रवींद्र आपल्या संसाराचा गाढा चालवत होता. त्याच्यामागे वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. हातमजुरी करणाऱ्या रवींद्रच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी कळवण तहसील कार्यालयाकडे केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nashik news One dies of lightning collapse