कांदारोप ३० हजार रुपये पायली

संतोष विंचू
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

येवला - सरतेशेवटी आलेल्या पावसाने रोपे सडल्याने सध्या कांदालागवडीसाठी आवश्‍यक असलेल्या उन्हाळ कांदारोपाची मागणी वाढली आहे. शेतकऱ्याला या रोपांसाठी पायलीला (सात किलो) ३० हजार रुपये मोजावे लागत आहेत. रोपे असलेले काही शेतकरी तेजी येऊनही विक्री करीत नसल्याचेही चित्र तालुक्‍यात आहे.      

येवला - सरतेशेवटी आलेल्या पावसाने रोपे सडल्याने सध्या कांदालागवडीसाठी आवश्‍यक असलेल्या उन्हाळ कांदारोपाची मागणी वाढली आहे. शेतकऱ्याला या रोपांसाठी पायलीला (सात किलो) ३० हजार रुपये मोजावे लागत आहेत. रोपे असलेले काही शेतकरी तेजी येऊनही विक्री करीत नसल्याचेही चित्र तालुक्‍यात आहे.      

खरिपातील पोळ व रब्बीतील रांगडा कांद्याचे उत्पादन सर्वदूर घेतले जात असले, तरी साठवणक्षमता असणारा उन्हाळ कांदा प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो. कसमादे व निफाड तालुका उन्हाळ कांद्याचा, तर येवला, चांदवड, नांदगाव तालुका पोळ व रांगडा कांद्याचा बालेकिल्ला आहे. उन्हाळ कांद्याची दिवाळी संपताच लागवड केली जाते. उन्हाळ कांदालागवडीसाठी अजूनही प्राधान्याने पारंपरिक वाणाच्या बियाण्यांचा वापर होतो. हे बियाणे उत्पादक स्वतः तयार करतात. 

कांदालागवडीसाठी बियाणे टाकून रोपे तयार करावी लागतात. हे रोपे लागवड करून कांदा उत्पादन घेतले जाते. मात्र, सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांनी रोपे घेण्यासाठी बियाणे टाकले अन्‌ ऑक्‍टोबरमधील ढगाळ हवामान, धुके अन्‌ पाऊस यामुळे कांदारोपांचे नुकसान झाले. मात्र, कांद्याच्या सद्यःस्थितीत गतवर्षाचा अनुभव लक्षात घेऊन शेतकरी उन्हाळ कांदा लागवडीचा जुगार खेळत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे मार्च-एप्रिलपर्यंत पाणी पुरून कांदा निघेल अशी स्थिती आहे, त्यांच्याकडे पुरेशी रोपे उपलब्ध नसल्याने कांदा बियाण्याच्या सात किलोच्या एका पायलीला २५ ते ३० हजार रुपये शेतकरी मोजत आहेत. सर्वसाधारण २ ते ४ हजार रुपये पायलीने ही रोपे मिळत होती. मात्र, रोपांची संख्या कमी आणि मागणी वाढल्याने पायलीचा भाव तब्बल दहापटीने वाढला. येवल्यात वैजापूर, कोपरगाव, निफाड व चांदवड आदी भागातून रोपांची विचारपूस सुरू झाल्याने हे दर वाढल्याचे शेतकरी सांगताहेत. 

कातरणी येथील भास्करराव जाधव यांनी आजूबाजूच्या गावांत चौकशी करूनही त्यांना रोप मिळेना, तर तांदूळवाडी येथील दादाभाऊ पिंगट यांच्याकडे चार शेतकऱ्यांनी २५ हजार रुपये पायली दराने रोपे मागूनही त्यांनी विक्री न केल्याचे सांगितले. काहींकडे पाणी नाही, पण अजून पाऊस पडेल या आशेवर रोपे विक्रीला त्यांनी ब्रेक लावला आहे.

Web Title: nashik news onion