"कांदा व्यापाऱ्यांच्या परकी कनेक्‍शनविषयी बोलणे अयोग्य' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नाशिक -  प्राप्तिकर विभागाकडून कांदा व्यापाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. कर चुकविल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.  पण अद्याप चौकशी सुरू आहे. दुबई कनेक्‍शन किंवा रॅकेटबद्दल चौकशीदरम्यान बोलणे योग्य नाही. मात्र प्राप्तिकर विभागाकडून अनेक पुराव्याची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे, असल्याची माहिती आज पुणे विभागाचे मुख्य प्राप्तिकर आयुक्त ए. सी. शुक्‍ला यांनी दिली. 

ते म्हणाले, की कांदा व्यापाऱ्यांबद्दलच्या अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी सुरू केली होती. त्यात चौकशात बरीच गोपनीय माहिती मिळाली असून ज्या व्यापाऱ्यांनी कर चुकविल्याचे सिद्ध होईल त्यांच्यावर हमखास कारवाई केली जाणार आहे. दुबई कनेक्‍शन व हवला रॅकेटबद्दल सध्या बोलणे उचित होणार नसले, तरी त्या बाबतचे पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. प्राप्तिकर विभागाकडून सर्व थरावर माहिती घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. काही माहिती हाती लागली आहे 

हे स्पष्ट करतानाच, पण चौकशी पूर्ण नसल्याने त्याविषयी बोलणे उचित होणार नसल्याचे स्पष्ट केले. शेतकरी असल्याचे भासवून प्राप्तिकर चुकविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शेतीची ढाल पुढे करीत, प्राप्तिकर चुकविणाऱ्यांवर खात्याने लक्ष केंद्रित केले आहे, असे ते म्हणाले.

Web Title: nashik news Onion Merchants Income Tax

टॅग्स