दुय्यम निंबधक कार्यालयातील ऑनलाइन यंत्रणा कोलमडली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नाशिक - दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाइन यंत्रणा सोमवारी अचानक बंद पडल्याने राज्यात दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले होते.

नाशिक - दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाइन यंत्रणा सोमवारी अचानक बंद पडल्याने राज्यात दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले होते.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीचे काम ऑनलाइन केले जाते. या यंत्रणेवर "नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर'कडून (एनआयसी) देखरेख ठेवली जाते. प्रमाणापेक्षा अधिक डाटा झाल्यामुळे एनआयसीचे सर्व्हर डाऊन झाले, त्यामुळे संपूर्ण राज्यात दस्त नोंदणीचे कामकाज अचानक ठप्प झाले. शनिवार-रविवारच्या सुटीनंतर आज या कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी गर्दी झाली होती. त्यामुळे पक्षकार व वकिलांना अनेक तास ताटकळत बसावे लागले. पुण्यातील पाच आणि मुंबईतील काही कार्यालय सुटीच्या दिवशी सुरू असतात पण तीही काल बंद होती. त्यामुळे ऑनलाइन पेमेंटसाठी आलेल्या नागरिकांना आज दस्त नोंदणी करता आली नाही. पुण्यात सर्व्हर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सायंकाळपर्यत यंत्रणेत सुधारणा न झाल्याने कामकाज बंदच होते.

Web Title: nashik news online system colapse