मुक्त विद्यापीठाचा पुरस्कार नीलिमाताई पवार यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

नाशिक - मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विशेष पुरस्कारार्थी म्हणून निवड करण्यात आली.

नाशिक - मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विशेष पुरस्कारार्थी म्हणून निवड करण्यात आली.

पवार यांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठासाठी दिलेल्या योगदानामुळे एक आदर्श निर्माण केला. संस्थेच्या सहकार्याने शिक्षणाची गंगा घरोघरी पोचविण्यात हातभार लावला आहे. येत्या 30 जूनला रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी अकरा वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पवार यांना याआधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार, तसेच पुणे येथील सर फाउंडेशन व डीपर संस्थेतर्फे आदर्श संस्थापालक असे पुरस्कार मिळालेले आहेत.

Web Title: nashik news open university award goes to nilimatai pawar