पार्सल स्फोटाच्या तपासासाठी एटीएसचे पथक नगरमध्येच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नाशिक - नगरला झालेल्या कुरिअर कार्यालयातील स्फोटप्रकरणी अद्यापही एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) हाती धागेदोरे लागलेले नाहीत. एटीएसचे एक पथक नगरमध्येच ठाण मांडून असून, काही पथके ही पुण्यासह मुंबईत आणि परराज्यांत तपास करीत आहेत.

गेल्या मंगळवारी (ता. 20) पुण्यातील सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना पाठविण्यासाठी पार्सल नगरच्या मारुती कुरिअर कार्यालयात देण्यात आले होते. गेल्या 20 तारखेला कर्मचारी पार्सलची नोंद करीत असताना अचानक स्फोट होऊन दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली होती. संबंधित प्रकरणाचा तपास नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला. पार्सल स्फोटासाठी एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Web Title: nashik news parcel blast inquiry ats scoud