विदेशी पर्यटकांसह दार्जिलिंगच्या पतगप्रेमींनी घेतला आनंद

विदेशी पर्यटकांसह दार्जिलिंगच्या पतगप्रेमींनी घेतला आनंद
विदेशी पर्यटकांसह दार्जिलिंगच्या पतगप्रेमींनी घेतला आनंद

येवलेकर झाले पतंगोत्सवात बेभान

येवला (नाशिक): पतंगोत्सवाला शनिवारी (ता. 13) भोगीच्या दिवशी सुरुवात झाल्यानंतर रविवारी संक्रांतीचा दुसर्‍या दिवशी येवलेकर पतंगोत्सवात बेभान झाल्याचे दिसून आले. संपूर्ण दिवसभर रंगबेरंगी पतंगांनी आकाश जणूकाही सप्तरंगी झाल्याचे दिसतांना दुसरीकडे वक्काट वक्काटच्या गगनभेदी आवाजांनी आसमंत दुमदुमला. जर्मनी, लंडनच्या विदेशी पर्यटकांसह देशातील दार्जिलिंगच्या पतगप्रेमींनीही येवला येऊन पतंग उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला.

नववर्षाच्या प्रारंभी येणारा पतंगोत्सव हा येवलेकरांच्या उत्सवातील मोठा सण. भोगी, संक्रांत आणि करि दिनाच्या दिवशी येवलेकर मोठ्या उत्साहाने पतंगोत्सव साजरा करतात. पतंगोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर शनिवारी सकाळ पासूनच येवलेकर गगनभेदी पतंग उडविण्यासाठी आपआपल्या घरांच्या गच्चीवर गर्दी करुन दिसून आले. आबालवृद्धांपासून लहान मुले-मुली, तरुण युवक-युवती रंगबेरंगी गॉगल्स लावून मंत्रमुग्ध होत पतंग उडवित होते. संगतीला घरांच्या गच्चीवर चित्रपटांची गीते मोठ-मोठे साऊंड सिस्टीम लाऊन वाजविण्यात येत होते. येवल्याची प्रसिद्ध हलकडी, ढोल-ताशांच्या गजरात अनेक ठिकाणी पतंगप्रेमी पतंग उडविण्यात मग्न दिसून आले. शहरातील चौका-चौकात पतंग स्टॉल, आसारी व मांजासाठी लागणार्‍या दोरा विक्रेत्यांच्या दुकानांवर साहित्य खरेदीसाठी येवलेकरांनी गर्दी केली होती.

जर्मनी आणि लंडनचे पर्यटकांची गगनभरारी
जर्मनीचा फ्रँकफर्ट येथील फेडोरोव्ह तर लंडनच्या भर्जने शहरातील गोल्डमन पंकज पारख यांच्या शो रूमच्या गच्चीवर सिद्धार्थ पारख आणि युवा उद्योजक सम्राट वर्मा यांच्यासह येवल्यातील पतंगोत्सवाचा आनंद लुटला. दुसरीकडे दार्जिलिंग येथील पर्यंटकानीही ताज पार्क कॉलोनीतील लालाजी गोतीस यांच्या घरावर पतंग उडवीत गगनभरारी घेतली. ‘झिंग झिंग झिंगाट’,  ‘याड लागलं’,  ‘बाई वाड्यावर या’  या गाण्यांनी पतंग प्रेमींना याड लागलंय....मागील वर्षी  ‘सैराट’ ने  ‘याड’ लावलेले असतांनाच पतंग प्रेमींनाही यंदाच्या पतंगोत्सवात पतंग उडवितांना या चित्रपटातील गाण्यांनी वेड लावल्याचे दिसून आले. घरांच्या गच्चींवरुन चित्रपटांची गीते वाजत असतांना संपूर्ण शहरात ‘झिंग झिंग झिंगाट’, ‘याड लागलय, याड लागलय’ ‘सैराट झालं जी’,  ‘बाई वाड्यावर या’, या गीतांवर पतंग प्रेमी बेभान नाचतांनाही दिसून आले.

वक्काट वक्काटच्या आवाजाने आसमंत दुमदुमले
थंडीच्या भल्या पहाटेच येवलेकरांनी पतंगोत्सवात पतंग उडविण्यासाठी गर्दी केली. समोरच्या स्पर्धकाचा पतंग कापल्यावर पतंग प्रेमी ‘वक्काट वक्काट’ चा आवाज करत होते. पतंग कापल्यानंतर पतंग प्रेमींचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसून आला. आकाशात कटलेले पतंग पकडण्यासाठीही लहान मुले मोठ-मोठे बांबु घेऊन पळतांना आढळून आले. दुपार नंतर तर शहरवासीय रात्री उशिरापर्यंत पतंगोत्सवाचा आनंद घेत होते. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने पतंग प्रेमी गर्दी करुन पतंग उडविण्याचा आनंद लुटत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com