नाशिक: पत्नी-मुलाची हत्या करून त्याची आत्महत्त्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

पिंपळगाव बसवंत येथील पवननगर भागात सदरचा प्रकार घडला. नागमल कुटुंबीय दोन आठवड्यांपूर्वीच रहावयास आले होते. रवींद्र भटू नागमल याने मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी सुरेखा रवींद्र नागमल व शिक्षणासाठी आलेला विशाल विजय पानपाटील (10) या दोघांची हत्या केली. त्यानंतर रवींद्र नागमल याने स्वत:ला गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.

नाशिक - रमजान सणाच्या पूर्वसंध्येला पाचवर्षीय मुलाचा गळा आवळून हत्त्या केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, पिंपळगावमध्ये एकाच कुटूंबातील तिघांची हत्त्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यात व्यक्तीने पत्नी आणि शिकण्यासाठी आलेल्या दहा वर्षाच्या मुलाची हत्त्या करून स्वत:ला गळफास लावून आत्महत्त्या केली आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिंपळगाव बसवंत येथील पवननगर भागात सदरचा प्रकार घडला. नागमल कुटुंबीय दोन आठवड्यांपूर्वीच रहावयास आले होते. रवींद्र भटू नागमल याने मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी सुरेखा रवींद्र नागमल व शिक्षणासाठी आलेला विशाल विजय पानपाटील (10) या दोघांची हत्या केली. त्यानंतर रवींद्र नागमल याने स्वत:ला गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. सकाळी शेजाराचे पाणी आल्याचे सांगण्यासाठी आले असता, सदरचा प्रकार उघडकीस आला. पिंपळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. नागमल यांचा मुलगा अमोल हा मात्र सुखरूप आहे. सदरच्या घटनेमागील कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान काल रात्रीच बेपत्ता साहिल पिंजारी याच्या हत्त्येची घटना उघडकीस आल्यानंतर आज सकाळी सदरचा प्रकार घडला. त्यामुळे पिंपळगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
नाशिक: पिंपळगाव बसवंत येथे अल्पवयीन मुलाचा खून​
खेड: जगबुड़ी, नारंगी नदीला पूर​
सह्याद्री सायकलिस्टने अमेरिकेत फडकविला तिरंगा
ट्रम्प यांनी मोडली व्हाईट हाऊसमधील "इफ्तार' परंपरा...
शेतकरी व शिवसेना एकत्र आल्यामुळे कर्जमुक्ती- उद्धव ठाकरे​
नितीशकुमारांचे अपने रंग हजार ....​
काळाकुट्ट २५ जून अन्‌ बिनचेहऱ्याचा प्रकाश!​
फेसबुकवरही "विराट'चे विराटप्रेमी​
भारताचा विंडीजवर 105 धावांनी विजय​
सरकारचे तोंड शेतकऱ्यांकडे वळविले - खोत​

Web Title: Nashik news person killed wife and son