तीन दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर पोलिसांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नाशिक - पोलिस आयुक्तालयात अखेर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर रात्री उशिरा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस शिपायांपर्यंतच्या ४८६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. स्वतः पोलिस आयुक्तांनी बदल्यांमध्ये लक्ष घातल्याने अनेकांचा हिरमोड झाला; तर विनंत्या बदल्यांमध्येही त्यांनी त्याच विभागात काम करण्याचा विनंती अर्ज फेटाळून लावला. एक प्रकारे आयुक्तांनी बदल्यांमध्ये हस्तक्षेप झुगारल्याचे बोलले जात आहे.

पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय झाला होता. याबाबत आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी आयुक्तालयातील सहाय्यक उपनिरीक्षकापासून ते कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड मागून घेत त्यातून एकाच पोलिस ठाण्यात सहा वर्षे झालेल्यांचा बदलीसाठी प्राधान्याने विचार केला. त्यांनी ज्या कर्मचाऱ्याने एकाच ठिकाणी अधिक काळ सेवा केली असेल त्यांनाही बाजूला हटविले. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांनी विनंती अर्ज करून यापूर्वीच्या ठिकाणी काम केलेल्या पोलिस ठाण्यात मागणी केली, त्यांचाही विचार केला नाही, अशी चर्चा आहे. 

आज रात्री उशिरा जाहीर केलेल्या बदल्यांमध्ये १२ सहाय्यक उपनिरीक्षक, ५३ हवालदार, ४२ पोलिस नाईक, ३१५ पोलिस शिपायांची बदली करण्यात आली आहे. विनंती अर्जानुसार नऊ सहाय्यक उपनिरीक्षक, ३६ हवालदार, ३० पोलिस नाईक व ९६ पोलिस शिपाई अशा एकूण १७१ जणांच्या बदल्या केल्या आहेत. 

बदल्यांसंदर्भात कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचाही आढावा आयुक्तांनी घेतला. बदल्या जाहीर होईपर्यंत काही कर्मचाऱ्यांकडून लॉबिंग सुरू होते. त्यासाठी भेटीगाठी घेतल्या जात होत्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याची चर्चा आहे.

Web Title: nashik news police