हुक्का पार्लर, स्पा सेंटरची पोलिसांकडून कसून तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नाशिक - कॉलेज रोडवरील एका रेस्टॉरंट बारमधील राड्यानंतर पोलिसांनी बुधवारी (ता.17) रात्री गंगापूर रोड, मुंबई नाका व म्हसरूळ परिसरातील हुक्का पार्लर, स्पा सेंटरसह बार-हॉटेलमध्ये जाऊन कसून तपासणी केली. परिमंडल-1 चे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण यांच्यासह गुन्हेशोध पथकाने बुधवारी रात्री गंगापूर रोड परिसरातील हुक्का पार्लर व स्पा सेंटरची तपासणी केली.

मुंबई नाक्‍यासह म्हसरूळ परिसरातील हॉटेल, स्पा सेंटर व हुक्का पार्लरमध्ये कसून तपासणी केली. लॉजिंग- हॉटेल, परमीट बारची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मोहिमेत पोलिसांनी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या मोहिमेत गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. डी. पाटील, म्हसरूळचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, मुंबई नाक्‍याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सहभागी झाला. 

Web Title: nashik news police Hookah parlor SPA center