बागलाणमध्ये डाळिंबावर तेल्या रोगाचे आक्रमण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

सटाणा - बागलाण तालुक्‍यात डाळिंब पिकावर तेल्या रोगाने थैमान घातले असून, हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील डाळिंबबागा नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या आठवड्यात तेल्या रोगाने तयार डाळिंब पिकावर आक्रमण केल्याने कोट्यवधींचे नुकसान होईल.

पाच वर्षांपासून डाळिंब पिकाबाबतची अनिश्‍चितता वाढली होती. दहा ते पंधरा वर्षांपूर्वीच्या जुन्या डाळिंबबागा तेल्या रोगामुळे उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. नुकत्याच लागवड केलेल्या व पहिला बहार धरलेल्या डाळिंब पिकावर आता अचानक तेलकट डाग पडताहेत. डाळिंबाची तयार फळे तडकणे, झाडाचा पाला कोमेजणे व फांद्यांवर तेलासारखा थर प्रत्येक बागेत दिसत आहे. तेल्या रोगाच्या थैमानामुळे डाळिंब बागायतदारांमध्ये नैराश्‍य पसरले आहे. कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याने हमीभाव देणारे व्यापारी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी नव्याने डाळिंबाची लागवड केली होती. 

काहीही करून तेल्या रोगाला प्रतिबंधक औषधे बाजारात येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आता शेवगा, पपई, आंबा आदी पिकांवरही होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

- केशव मांडवडे, शेतकरी व संचालक, डाळिंब महासंघ

Web Title: nashik news pomegranate