नाशिकच्या पूनम बेडसेंना  सौंदर्यवती स्पर्धेत मुकुट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नाशिक - सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या निकषावर येथील पूनम निशिकांत बेडसे यांना ‘मिसेस महाराष्ट्र स्टाइल आयकॉन’चा बहुमान मिळाला आहे. स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पुण्यातील हिंजवडीमधील तारांकित हॉटेलमध्ये झाली.

नाशिकमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीत बाजी मारून पुण्यात राज्यातील अन्य सौंदर्यवतींशी स्पर्धा सौ. बेडसे यांनी केली. दिवा पॅजेंटस आणि खासगी वाहिनीतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मते मागवण्यात आली होती. अंतिम फेरीतही बुद्धीचा कस लागला. पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये त्यांची निवड झाली होती. त्यांना मानाचा मुकुट प्रदान करण्यात आला. सौ. बेडसे या स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवीधर आहेत.

Web Title: nashik news Poonam Bedase