हेच फळ काय अविरत छपाईला..!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

प्रेस कामगारांना दहा हजार बोनस; वाढ नाहीच, अधिकाऱ्यांना वगळले, दिवसरात्र मेहनत

नाशिक - प्रेस महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी दहा हजार रुपये बोनसची घोषणा केली आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या काळात प्रभावी काम करूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बोनसमध्ये वाढ नसल्याने प्रेस कामगारांचा भ्रमनिरास झाला आहे.

केंद्र सरकारच्या मिनीरत्न एक दर्जा असलेल्या सिक्‍युरिटी प्रिंटिंग ॲन्ड मिंटिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया (एसपीएमसीआयएल)ने देशातील मुद्रणालये टाकसाळ आणि कागद कारखान्यातील कामगारांना गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दहा हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. देशातील नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीत तब्बल नऊ महिने अविरत काम केल्याने यंदा बोनसमध्ये वाढीची अपेक्षा होती. मात्र बोनसवाढ नसल्याने कामगारांचा भ्रमनिरासच झाला आहे. प्रेस महामंडळाने आज निरीक्षक व कामगार वर्गासाठी बोनस देण्याची घोषणा केली आहे. अधिकारी वर्गाला मात्र बोनसमधून वगळले आहे. एस-२ वर्गातील सगळ्यांना २०१६-१७ आर्थिक वर्षासाठी दिवाळीच्या तोंडावर दहा हजार रुपये बोनस देण्याबाबत आज निर्णय झाला. प्रेस महामंडळाच्या अखत्यारीतील देशातील सगळी मुद्रणालये, टाकसाळी आणि कागद कारखान्याच्या महाव्यवस्थापकांना तशा आशयाचा आदेश जारी करण्यात आला आहे.

Web Title: nashik news press employee no increment