कैद्यांची कलाकुसर जाणार सातासमुद्रापार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

जेल रोड - नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुलाफेस्टमध्ये विक्रीची संधी मिळणार आहे. तशा आशयाचे पत्र कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांना मिळाल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले. 

जेल रोड - नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुलाफेस्टमध्ये विक्रीची संधी मिळणार आहे. तशा आशयाचे पत्र कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांना मिळाल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले. 

नाशिकला होणाऱ्या सुलाफेस्टला जगभरातून पर्यटक हजेरी लावतात. सुलाफेस्टमुळे बंदिवानांची कलाकुसर निश्‍चितच सातासमुद्रापार जाण्याची संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे बंदिवानांच्या सर्जनशीलतेला वाव, नवनिर्मितीची प्रेरणा मिळून जगण्याची नवी उमेद मिळेल. आयुष्यात जाणते-अजाणतेपणातून व्यक्तींच्या हातून एखादा गुन्हा घडतो. त्याचे प्रायश्‍चित्त म्हणून बंदिवान शिक्षा भोगत असतात. मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतानाच बंदिवानांच्या पुनर्वसनासाठी व त्यांचे उर्वरित आयुष्य स्वावलंबी पद्धतीने जगण्यासाठी कारागृहातच कारखाना विभागांतर्गत विविध वस्तू व पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत कारागृहाच्या प्रशासनातर्फे बंदिवाननिर्मित वस्तूंची विक्री "ना नफा ना तोटा' धर्तीवर आनंदमेळ्यात केली जाते. त्यातून या बंदिवानांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळत असते. कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी यांनी कारागृहातील बंदिवानांतील सर्जनशीलता ओळखून या वर्षी राज्यात पहिल्यांदाच बंदिवानांकडून शाडूच्या गणेशमूर्ती बनवून घेतल्या. नागरिक व कारागृहाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे साळी यांनी बंदिवानांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून विविध मूर्ती बनविण्याचा सल्ला दिला. आजमितीला बंदिवानांनी अनेक सुंदर मूर्ती व कलाकुसरीच्या वस्तू निर्माण केल्या आहेत. त्यातच सुला विनियार्डकडून सुलाफेस्टमध्ये विक्रीची संधी चालून आल्याने बंदिवानांच्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

Web Title: nashik news Prisoner Crafts