कर्करोग कक्षाच्या मंजुरीसाठी केंद्राला 45 कोटींचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नाशिक - विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात प्रगत (टर्शरी) कर्करोग केअर कक्ष सुरू करण्यासाठी केंद्राकडे 45 कोटींचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. संदर्भ सेवा रुग्णालयातील सुविधांबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारी मांडल्या. त्या वेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्राच्या टर्शरी केंद्राबाबत माहिती दिली.

नाशिक दौऱ्यावरील आरोग्यमंत्री सावंत यांनी प्रगत कर्करोग केअर सेंटरच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने केंद्राकडे 45 कोटींचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी स्वतः केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याने लवकरच नाशिकला प्रगत कॅन्सर केअर रुग्णालय उपलब्ध होईल. केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राज्य कॅन्सर सोसायटीतर्फे राज्यातील विविध रुग्णालयांत हे केंद्र सुरू होणार आहे.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कर्करोग रुग्णांसाठी 2008 पासून रुग्णालय आहे. त्यात साधारण 26 हजार 174 कर्करोग पीडित रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचार झाले. त्यातील तीन हजार 463 रुग्णांवर केमोथेरेपी सात हजार अकरा रुग्णांवर रेडिओथेरेपी उपचार झाले. अशा महत्त्वाच्या रुग्णालयात सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी अत्याधुनिक किरणोपचार यंत्राची गरज आहे. त्यासाठी 20 कोटी 50 लाख, तर पीडित रुग्णावरील किरणोपचारासाठी भूमिगत बंकर उभारण्यासाठी 1.5 कोटी याप्रमाणे नियोजन आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज आरोग्यमंत्री सावंत यांनी नाशिकचे आरोग्यविषयक प्रस्ताव त्वरित केंद्राकडे पाठविण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: nashik news a proposal of Rs. 45 crores for the approval of cancer cell