लोकन्यायालयात तीन कोटींची नुकसानभरपाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

नाशिक - लोकन्यायालयाचा फायदा सर्वांसाठी या तत्त्वानुसार जिल्हा न्यायालयात आज मोटार वाहन अपघाताच्या प्रकरणात तीन कोटी २९ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणात ७४ लाख २८ हजार ५११ हजारांची वसुली करण्यात आली. विविध प्रकरणांतील हजारावर प्रकरणे निकाली काढण्यात आली.

विधी सेवा प्राधिकरणातर्फे आज जिल्ह्यातील सर्व न्यायालयात झालेल्या लोकअदालतीस सर्वत्र उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. जिल्हा न्यायालयात प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व सांगितले. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश एस. एम. बुक्के यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. डाके यांनी आभार मानले. जिल्हा न्यायालयात विविध पॅनलवर सहा हजार ७१० प्रकरणे ठेवली होती. न्यायालयात प्रलंबित असलेली एक हजार ९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दावा दाखलपूर्व एक हजार ४४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. 

Web Title: nashik news Public court