पुणे-पनवेल-कामाख्यासाठी रेल्वेच्या 26 विशेष फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

नाशिक - मध्य रेल्वेने पुणे-कामाख्या विशेष रेल्वेसेवा सुरू केली आहे. पनवेल-नाशिक रोड ते नागपूरपर्यंतच्या विविध मार्गांवरील प्रवाशांची सोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या या विशेष रेल्वेगाडीची (82505) सेवा 6 जुलै ते 28 सप्टेंबरपर्यंत राहणार असून, 26 विशेष फेऱ्या होणार आहेत.

पुणे स्थानकाहून गुरुवारी सकाळी साडेदहाला ही गाडी सुटून शनिवारी दुपारी साडेतीनला कामाख्या स्थानकात पोचेल. 3 जुलैपासून 25 सप्टेंबरपर्यंत तसेच दर सोमवारी (82506) कामाख्या येथून ही गाडी सुटून चौथ्या दिवशी गुरुवारी रात्री अकराला पुण्यात पोचेल. गाडीला दोन वातानुकूलित टू टायर, तीन एसी-3 टायर, आठ शयनयान श्रेणी, चार द्वितीय श्रेणी याप्रमाणे डब्यांची सोय असेल.

Web Title: nashik news pune-panvel-kamakhya railway