राष्ट्रवादी रोखणार दिल्लीच्या रेल्वेगाड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नाशिक - शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता. 26) सकाळी नऊला मनमाड येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल. मुंबईत ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याने मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या रोखण्यात येणार नाहीत. दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रोखण्यात येतील, असे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांनी स्पष्ट केले.
Web Title: nashik news railway ncp agitation