शहरात वीस मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नाशिक - नाशिक शहरात काल सायंकाळी पाचच्या सुमारास 20 मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काल  दुपारपासून कडक ऊन पडले होते. हवेत दमटपणा होता, उकाडाही वाढला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आभाळ भरून येऊन पावसाला सुरवात झाली. पाहता पाहता पावसाने चांगलाच जोर धरला. रस्त्यावरील विक्रेत्यांची, कालिका यात्रेत आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. 20 मिनिटे दमदार पाऊस झाला. जिल्हा प्रशासनाने हा पाऊस मोजला असता 20 मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर परिसरात विजांचा कडकडाट सुरू होता.

नाशिक - नाशिक शहरात काल सायंकाळी पाचच्या सुमारास 20 मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काल  दुपारपासून कडक ऊन पडले होते. हवेत दमटपणा होता, उकाडाही वाढला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आभाळ भरून येऊन पावसाला सुरवात झाली. पाहता पाहता पावसाने चांगलाच जोर धरला. रस्त्यावरील विक्रेत्यांची, कालिका यात्रेत आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. 20 मिनिटे दमदार पाऊस झाला. जिल्हा प्रशासनाने हा पाऊस मोजला असता 20 मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर परिसरात विजांचा कडकडाट सुरू होता. शहर व परिसरात कोठेही वीज पडल्याचे अथवा अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. 

Web Title: nashik news rain