धरण पाणलोटात तीन तासांत ११३ मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

नाशिक - नाशिकला आजचा पाऊस जणू इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यांतील धरणासाठीच पडला. दोन्ही धरणांच्या माथ्यासह पाणलोट क्षेत्रात सकाळी सात ते दहा या तीन तासांत तब्बल ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे सायंकाळपर्यंत एका दिवसात गंगापूर ३५०, तर दारणा धरणात ४५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढला. असे असले तरी इतर तालुक्‍यांना मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा कायमच आहे.

जिल्ह्यात सात ते आठ तालुक्‍यांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. मध्यरात्रीपासून इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यांत जोरदार पाऊस झाला. गंगापूर आणि दारणा धरणांचे पाणलोट क्षेत्र हाच आजच्या मुसळधार पावसाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे आजच्या पावसाने शहर व जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची मोठी सोय केली. दिवसभरात त्र्यंबकेश्‍वर, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, सुरगाणा हे पश्‍चिम पट्ट्यातील पावसाळी तालुक्‍यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. नाशिक तालुक्‍यात धरण क्षेत्राकडील पश्‍चिम भागातच पाऊस कोसळला.

नाशिकच्या आजच्या पावसाचा दोन्ही धरणांचे पाणलोट क्षेत्र हेच केंद्रबिंदू राहिले. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचा सात ते दहापर्यंत मोठा जोर होता. आज सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत नाशिक ः ३० मिलिमीटर, इगतपुरी- २०, त्र्यंबकेश्‍वर- ६२, दिंडोरी- ५, पेठ- १७.२, निफाड- ३.२, सुरगाणा- ५.७, देवळा- २, मालेगाव- १ मिलिमीटर पाऊस झाला. चांदवड, सिन्नर, येवला, नांदगाव, कळवण तालुक्‍यांना पावसाची आस कायमच होती.

‘दारणा’च्या जलसाठ्यात वाढ
इगतपुरी : शहरासह घोटी परिसरातील सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दारणा धरणात २४ तासांत ६७० दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले आहे. दारणाच्या पाणलोटात काल (ता. ३०) दारणाच्या भिंतीजवळ ४१ मिलिमीटर, घोटी येथे ११९, इगतपुरीत १३८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे काल सकाळी ७५० दशलक्ष घनफूट असलेला साठा आज सकाळी एक हजार ४२० दशलक्ष घनफुटावर पोचला आहे.

Web Title: nashik news rain dam