नाशिकमध्ये गोदावरीला पूर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नाशिक - पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्‍यात मंगळवारी (ता.19) सायंकाळपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. रात्रीच्या मुसळधार पावसानंतर विविध धरणातून बुधवारी विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीसह विविध नद्यांना पूर आला आहे. त्यातच, सर्वपित्री अमावास्येमुळे गोदातीरी धार्मिक विधी आणि आठवडे बाजारासाठी जमलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. 

नाशिकमधील धरणातून काल सायंकाळपासूनच विसर्ग सुरू आहे. सकाळी आठनंतर अकराला पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला. गंगापूर, दारणा, पालखेड, नांदूर मध्यमेश्‍वर, कडवा या धरणांमधून विसर्ग सुरू होता. गंगापूर धरणातील पाण्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. पितृपक्षाचा आज अखेरचा दिवस असल्याने पितरांच्या पूजनाला आणि नदी स्नानाला गर्दी होती. मात्र पुराच्या पाण्याखाली असलेल्या रामकुंडावर धार्मिक विधी करणे अवघड झाले होते. परिणामी, नदीपात्रालगत जागा मिळेल तेथे पितृपक्षाचे विधी सुरू होते. आज बुधवारचा आठवडे बाजार भरतो. त्या घाटावर पाणी असल्याने विक्रेत्यांची धांदल उडाली.

Web Title: nashik news rain godavari river flood