नाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

धरण समूह साठा दशलक्ष घनफूट टक्केवारी

  • गंगापूर 2743 27
  • दारणा समूह 4398 23
  • चणकापूर समूह 5629 24
  • ओझरखेड 299 09
  • पालखेड समूह 435 05

नाशिक : सलग तीन दिवसांच्या समाधानकारक पावसाने धरणातील साठ्यात वाढ झाली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला पण पण इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर नाशिकपुरता मर्यादीत पावसाने आज कळवण, पेठ, सुरगाणा तालुक्‍यांना दिलासा दिला. शहरात पूर्णपणे उघडीप होती. दारणा धरणातून आज पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यात आज 148 मिमी. पाउस झाला.

पावसाचा सकाळी जोर कायमच होता. दिवसभर असाच पावसाचा जोर राहिल्यास नदीपात्रातून पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता गृहीत धरुन दारणेतून 1 हजार 100 क्‍युसेस पाणी सोडण्यात आल्याने दारणेकाठच्या गावांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाउस सुरु असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पावसाचा मोठाच लाभ होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यावर चांगला परिणाम झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी टॅकरची संख्या 42 होती. प्रशासनाने पावसाचा जोर पाहून सगळे टॅकर बंद केले आहेत.

सहा तालुक्‍यांना पावसाची प्रतीक्षा
सिन्नर, देवळा, येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्‍यांना आजही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दिवसभरात पेठ सुरगाणा कळवण तालुक्‍यांत चांगली हजेरी लावल्याने तेथील शेती कामांत उत्साह आला आहे.सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यत तालुकानिहाय झालेला पाउस असा ः नाशिक 41 मिमी, इगतपुरी 20, त्र्यंबकेश्‍वर 20, दिंडोरी 6, पेठ 18.2, निफाड 2.8, चांदवड 6, कळवण 17, सुरगाणा 10.4 मि.मी याप्रमाणे पाऊस पडला.

    Web Title: nashik news rain halt respite agri works speed up