नाशिक रोडला सखल भागात पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

नाशिक रोड - जोरदार पाऊस झाल्याने नाशिक रोड परिसरात काल सायंकाळी नागरिकांची धावपळ झाली. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी व नागरिक सुखावले आहेत. मात्र, विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराणही झाले. 

काही दिवसांपासून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला. रविवारी दुपारी हवामानात अचानक बदल होऊन गारवा निर्माण झाला. आकाशात अचानक ढग जमा झाले व पावसाला सुरवात झाली. काही ठिकाणी विजेचा कडकडाट झाला. 

जेल रोड, शिंदे, पळसे, विहितगाव, देवळालीगाव, एकलहरे, सामनगाव, सिन्नर फाटा, चेहेडी आदी भागात पावसाने चांगली हजेरी लावली. हातगाडी व रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली. काही ठिकाणी नुकसान झाल्याचे समजते. पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. त्याचा फटका व्यापारी व दुकानदारांना बसला. नाशिक रोडच्या काही सखल भागात पाणी साचले. बिटको चौक, मीना बाजार, देवी चौक, शिवाजी चौक या भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास झाला. रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता.

पहिल्याच पावसात महापालिकेचे पितळ उघड    
लॅम रोड - काल झालेल्या पहिल्याच पावसात महापालिकेच्या पावसाळीपूर्व कामकाजाचे पितळ उघडे पडले. अनेक ठिकाणी ड्रेनेज स्वच्छ केलेले नसल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबल्याने वाहनधारकांसह तेथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास झाला.  गोसावीवाडी, चंदनवाडी, गुलाबवाडी, आनंदनगर परिसर, आडकेनगर, जगताप मळा यांसह जय भवानी मार्गवरील अनेक कॉलन्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेकांच्या घरांत पाणी शिरले. जय भवानी मार्गावरील नाल्यावर नुकताच बांधलेला पूल उंच व रस्ता खोलगट झाल्यामुळे तेथे पाणी तुंबले. त्यामुळे नागरिकांना स्वतःहून ड्रेनेजचे झाकण उघडावे लागले. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाला गटारी स्वच्छता करण्यासाठी कंत्राटे दिली गेली; परंतु त्यांची कामे थातूरमातूर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, पहिल्याच पावसाने हे हाल झाले, तर चार महिन्यांत काय होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Web Title: nashik news rain north maharashtra