रक्षाबंधनाचा अमाप उत्साह, खरेदीसाठी भगिनींची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नाशिक - बहीण-भावाचे प्रेमाचे नाते रेशमी धाग्यात घट्ट बांधणाऱ्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भगिनींची राखी खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. जरदोसी, स्टोन राखी, कार्टूनच्या तसेच लेझर लायटिंगच्या राख्यांना मागणी दिसून आली. यंदा ‘जीएसटी’चा फटका रक्षाबंधनालाही बसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

आज सुटीचा दिवस असल्याने राख्या खरेदीने दुकाने फुलली. सायंकाळी गर्दीत वाढ झाली. कानडे मारुती लेन, मेन रोड तसेच रेड क्रॉस सिग्नल परिसरात राख्यांची दुकाने सजली आहेत. राख्यांमध्ये या वर्षी नवनवीन राख्यांची क्रेझ दिसून आली. यामध्ये बाहुबली, छोटा भीम, डोरेमोन, स्पायडरमॅन, गिटार, राधाकृष्ण, गणपती, मोटू-पतलू यांच्यासह विविध प्रकारच्या स्टोनच्या राख्यांना मागणी होती. बारा रुपये डझनपासून ते दोन हजार रुपये डझनपर्यंत विक्री झाली. राखी विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली. राख्यांवरही १२ टक्के ‘जीएसटी’ असल्याने त्याचाही फटका या वर्षी बसला आहे. असे असले तरी राख्या खरेदीचा उत्साह मात्र दिसून येत होता. 

राख्यांवर १२ टक्के ‘जीएसटी’ असल्याने त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे तुलनेने या वर्षी २० ते २५ टक्के दरात वाढ झाली. तरीही ग्राहकांचा उत्साह कायम आहे. या वर्षी खूप नवनवीन प्रकार आल्याने भगिनींना पर्याय उपलब्ध आहेत. बाहुबली, लायटिंगच्या राख्या तसेच स्टोनच्या राख्यांना चांगला प्रतिसाद आहे. 
- सुजय सोनवणे, संचालक, दिलीप राखी

Web Title: nashik news rakhi purnima