रामायण, महाभारत उत्तम दर्जाचे महाकाव्य - विवेक घळसासी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नाशिक - रामायण, महाभारत कीर्तनकारांनी रंगविला, तर प्रवचनकारांनी फुलविला. या ग्रंथांतून प्रतित होणारा इतिहास गुदमरला. रामायण, महाभारत ग्रंथ उत्तम दर्जाचे महाकाव्य असून, त्यांचे प्राणतत्त्व इतिहास आहे. हे ग्रंथ स्वतंत्र ऐतिहासिक, कलाकृती आहेत. मात्र, इतिहास म्हणून या ग्रंथांना कमी महत्त्व दिले गेले, अशी खंत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी आज येथे व्यक्‍त केली.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात ग्रामोदय शिक्षण संस्था व हिरे परिवारातर्फे (कै.) रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपात ते ‘महाभारत काव्य की इतिहास?’ या विषयावर बोलत होते. माजी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिकप्रमुख विजय कदम, विभागीय समाजकल्याण उपायुक्‍त राजेंद्र कलाल, ॲड. दौलतराव घुमरे, आर. आर. हिरे, प्राचार्य यशवंत पाटील, भाऊ पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, बापूसाहेब कोतवाल, नगरसेविका सुप्रिया खोडे, भाजपचे सुरेश पाटील, अभय छल्लानी, आमदार सीमा हिरे, सुमन हिरे आदी उपस्थित होते. 

श्री. घळसासी म्हणाले, की रामायण, महाभारत ग्रंथांवर आधारित मालिका केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तान, बांग्लादेशातही पाहिल्या गेल्या. ब्रिटिशांनी भारताचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हाच विचार पुढे ६० वर्षांपर्यंत सत्ताधारी, विद्यापीठे, अभ्यास निर्माण करणाऱ्यांनीही नेला.

कम्युनिस्ट विचार मेला, केवळ अंत्यसंस्कार बाकी
भारतीय कम्युनिझमचा इतिहास भारतीय संस्कृतीत सुरुंग लावण्याचा राहिला आहे. कम्युनिस्ट विचार मेला असून, केवळ अंत्यसंस्कार बाकी आहेत, असे वादग्रस्त विधान श्री. घळसासी यांनी केले. ते म्हणाले, ‘समाजवादी म्हणवणारी छुपी टोळी अवसरवादी होती. त्यांनी ७० वर्षे हिंदुत्वाची अवहेलना केली. तथाकथित विचारवंतांनी नेहमीच बुिद्धभेद करण्याचे काम केले. गोहत्येपेक्षा बुिद्धभेद हे पाप असल्याचे गीतेत म्हटले असल्याचा त्यांनी दाखला दिला.

Web Title: nashik news ramayan mahabharat Best quality epic