बाप्पा महोत्सवात साकारला महागणपती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नाशिक - येथील प्रसिद्ध रांगोळीकार नीलेश देशपांडे यांनी गणेश जयंतीनिमित्त सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका हॉल येथे ‘बाप्पा महोत्सव’ भरवला आहे. या महोत्सवात आज सकाळी सहा ते दुपारी तीन या वेळेत साडेतीन हजार चौरस फूट आकारात महागणपतीची रांगोळी साकारण्यात आली. यासाठी १०० किलो पांढरी रांगोळी, २०० किलो रंगीत रांगोळी वापरण्यात आली. या कलाकृतीची जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आल्याची माहिती नीलेश देशपांडे यांनी दिली.

देशपांडे म्हणाले, की ‘भाव तसा देव’ या उक्तीनुसार रांगोळीच्या माध्यमातून बाप्पाची विविध रूपे साकारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने शुक्रवारी (ता. १९) गणेशाची १२५ विविध रूपे साकारून विश्‍वविक्रम करण्याचा मानस आहे. ६५० मिनिटांत गणपतीची १२५ विविध रूपे १२५ महिला साकारणार आहेत. हे गणपती साकार होत असतानाच त्याला १२५ गणेशाच्या भजनांची जोड देण्यात येणार आहे. या कलाकृतीचीही जिनियस तसेच वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार आहे. आजपर्यंत रांगोळीच्या माध्यमातून विविध विषयांकडे लक्ष वेधले आहे. आयुर्वेदातून रांगोळी याद्वारे आयुर्वेदातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांवर प्रकाश टाकला. महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी ‘तू दुर्गा’ या रांगोळी प्रदर्शनातून विविध कर्तृत्वमान महिलांच्या कार्याला सलाम केला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला समितीच्या अध्यक्षा सोनल दगडे, समिती सभासद दीपा चंगराणी, योगिनी देशपांडे, वृंदा लव्हाटे, योगिता खांडेकर, अजिंक्‍य मोहोळकर आदी उपस्थित होते. अमी छेडा परीक्षक होते. १९ ते २१ जानेवारीदरम्यान सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.

Web Title: nashik news rangoli ganesh