गुंगीचे औषध पाजून बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नाशिक - सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली ओळख एका महिलेसाठी घातक ठरली. एका संशयिताने गुंगीचे औषध पाजून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, कुर्ला (उल्हासनगर) येथील रहिवाशी असलेली पीडित विवाहिता फेसबुकवर तीनपत्ती गेम खेळायची. त्यातून तिची ओळख दिल्लीतील संशयित अमित ओमप्रकाश जाजू (रा. ब्लॉक बी, शालिमारगाव, दिल्ली) याच्याशी झाली. सोशल मीडियावरून त्यांच्या फोनवरून संपर्क वाढला. मे 2014 मध्ये पीडित विवाहिता नाशिकमध्ये मावशीकडे आली असता, संशयित अमित जाजू तिला भेटण्यासाठी दिल्लीहून नाशिकला आला. त्या वेळी पीडित विवाहिता आपल्या 9 महिन्यांच्या मुलासह त्यास सीबीएस परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यास गेली असता, जेवणानंतर संशयिताने तिला पाणी दिले. ते पाणी पिल्यानंतर पीडिता हॉटेलच्या रूममध्येच झोपली. त्यानंतर संशयिताने मोबाईलमध्ये तिचे अश्‍लील व्हिडिओ चित्रण केले. हे जेव्हा पीडितेने पाहिले त्या वेळी संशयिताने तिच्याकडे 3 लाख रुपये खंडणीची मागणी केली; अन्यथा सदरचा व्हिडिओ तिच्या पतीला व ती नोकरी करत असलेल्या ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी दिली.

Web Title: nashik news rape on woman crime