रेशन दुकानदारांचा प्रस्तावित संप स्थगित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नाशिक - गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 1 एप्रिलपासून संपाची हाक देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना विधानसभा अधिवेशनानंतर बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्याचे आश्‍वासन सरकारने दिल्याने त्यांनी आपला प्रस्तावित संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर्स फेडरेशन, ऑल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने 19 मार्चला आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आंदोलन केले होते. या वेळी दुकानदारांच्या मागण्यांबाबत अन्न व पुरवठामंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने 1 एप्रिलपासून संपावर जाण्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला. सरकारने थेट परवानेच निलंबित करण्याच्या नोटिसा बजावल्याने काहीसे बॅकफुटवर आलेल्या रेशन दुकानदारांनी सरकारशी चर्चेची तयारी दर्शविली. पुरवठामंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत तमिळनाडूच्या धर्तीवर रेशन दुकानदारांना वेतन सुरू करण्याची मागणी शक्‍य नसून त्याऐवजी कमिशन वाढीबाबत विचार करण्याचे आश्‍वासन दिल्याचे समजते.

Web Title: nashik news ration shop strike stop