वसुली पथकासमोर कर्जदाराने घेतले विष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

नाशिक - सततच्या नैसर्गिक आपत्तीने पिके घशात घातली. जे हाती आलं त्याला बाजारात दर मिळेना. यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतीतून हाती काहीच येत नसताना जिल्हा बॅंकेने कर्जवसुली सुरू केली आहे. याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमोरच कर्जदार महिला शेतकरी व मुलाने विष प्राशन केले, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  

दरम्यान, कर्जदार महिला व तिच्या मुलास नाशिकरोड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्हा बॅँकेचे कर्जवसुली पथक पांढुर्ली येथे दुपारी वाजे मळ्यात गेले होते. या वेळी कर्जदार कुटुंबीय व वसुली पथक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर कैलास मुकुंद वाजे (वय ३२) याने वसुली पथकासमोरच विष प्राशन केल्याचे समजते. या वेळी त्याची आई सुलोचना मुकुंद वाजे यांच्याही अंगावर व तोंडात विष गेल्याचे कळते. या दोघांनाही त्यामुळे विषबाधा झाली. दोघांना नाशिकरोड येथील संतकृपा रुग्णालयात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

पधकाच्या वाहनावर दगडफेक
पांढुर्ली येथील सुलोचना मुकुंद वाजे यांनी विकास संस्थेकडून २००६ मध्ये कर्ज घेतले आहे. या कर्जवसुलीसाठी जिल्हा बॅँकेचे कर्जवसुली पथक इनोव्हा घेऊन गेले होते. या वेळी उभयतांमध्ये बाचाबाची झाल्याचे समजते. या वेळी कैलास यांच्या लहान भावाने वसुली पथकाच्या वाहनावर दगड फेकल्याने काच फुटली. याप्रकरणी जिल्हा वसुली पथकातील अधिकाऱ्याने वाहनाचे नुकसान झाल्याची फिर्याद सिन्नर पोलिस ठाण्यात दिली.

Web Title: nashik news recovery scoud loan debtor poison